इस्राईल पॅलेस्टाईन वादावर सर्वसामान्य तोडगा निघेल: मोदी

न्यूयॉर्क: इस्राईल ची स्थापना झाल्यापासून ते आज पर्यंत इस्राईल आणि पॅलेस्टाईन हा वाद सुरूच राहिला आहे. इस्राईल पॅलेस्टाईन च्या मोठ्या भागावर कब्जा केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात विवादित मुद्द्यांपैकी हा एक मुद्दा नेहमीच चर्चेत राहिला आहे. जगातील अनेक देश इस्रायलच्या या कृत्याबद्दल इस्राईल दोषी मानत असले तरी अमेरिका याबाबतीत इस्राईल ला पाठिंबा देत आला आहे.
इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात लवकरच निर्णायक चर्चा होऊन त्यांच्यातील वादावर सर्वसामान्य तोडगा निघेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केली. पॅलेस्टिनी नागरिकांना समर्थन देण्याच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मोदी यांनी भारताची भूमिका मांडली. पॅलेस्टिनी नागरिकांच्या पाठीशी भारत ठाम आहे. इस्राईल शी आमचे शांततापूर्ण संबंध आहेत, पॅलेस्टाईन च्या अस्तित्वासाठी आमचे समर्थन आहे. या दोघांमधील वाद लवकरच मिटेल असा आम्हाला विश्वास आहे. असे मोदी म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा