इस्रोने पुन्हा रचला इतिहास , भारतातील सर्वात मोठे LVM3 रॉकेट केले प्रक्षेपित, अवकाशात नेले 36 उपग्रह

पुणे, २६ मार्च २०२३ : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने आज २६ मार्च रोजी एकाच वेळी ३६ उपग्रह प्रक्षेपित केले. ब्रिटीश कंपनीचे उपग्रह घेऊन जाणाऱ्या इस्रोच्या LVM3 प्रक्षेपण वाहनाने सकाळी ९ वाजता श्री हरिकोटा येथून उड्डाण केले.

अधिकृत माहितीनुसार, ४३ मीटर उंच इस्रो रॉकेटने ब्रिटनच्या एका कंपनीच्या ३६ उपग्रहांना एकत्र घेऊन उड्डाण केले. याने ज्या उपग्रहांसह उड्डाण केलंय त्याच एकूण वजन आहे ५ हजार ८०५ टन. LVM3-M3/OneWeb India-2 असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. इस्रोने ट्विट करून या मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली .

इस्रोचे LVM3 हे सर्वात वजनदार प्रक्षेपण वाहन आहे. ज्यामुळे चांद्रयान-२ मोहिमेसह आतापर्यंत पाच यशस्वी उड्डाणे पूर्ण केली आहेत. खरं तर, ब्रिटनच्या वनवेब ग्रुप कंपनीने ७२ उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोची व्यावसायिक शाखा, न्यूजस्पेस इंडिया लिमिटेडशी करार केला होता.

इस्रोच्या म्हणण्यानुसार, जर हे प्रक्षेपण यशस्वी झाले, तर OneWeb India-2 अंतराळातील ६०० हून अधिक कमी पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांचे नक्षत्र पूर्ण करेल. यासोबतच जगाच्या प्रत्येक भागात स्पेस बेस ब्रॉडबँड इंटरनेट प्लॅनमध्ये मदत होईल.

न्यूज अनकट प्रतिनीधी: केतकी कालेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा