ISRO 14 फेब्रुवारी रोजी लाँच करणार ‘निरीक्षण उपग्रह’ EOS-4

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2022: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 5.59 वाजता त्यांच्या सर्वात विश्वासार्ह रॉकेट PSLV-C52 वरून या वर्षातील पहिलं प्रक्षेपण करणार आहे. हे रॉकेट श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या लॉन्चपॅडवर असेंबल केलं जात आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे. प्रक्षेपणाचं काउंटडाउन 25 तास 30 मिनिटे आधी सुरू होईल. प्रक्षेपण प्रक्रिया सकाळी 4.29 वाजता सुरू होईल. (फोटो: इस्रो)

इस्रोने गेल्या वर्षी आपल्या योजनेत म्हटलं होतं की ते PSLV-C52 रॉकेटसह जुलै 2021 मध्ये EOS-4/RISAT-1A उपग्रह प्रक्षेपित करेल. हा मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे. मात्र कोरोनाच्या कालावधीमुळं हे प्रक्षेपण पुढं ढकलण्यात आलं. आता त्याचे प्रक्षेपण सुरू आहे. या उपग्रहासोबत आणखी दोन उपग्रहही जाणार आहेत- पहिला- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला INSPIREsat-1 आणि दुसरा भारत-भूतान संयुक्त उपग्रह INS-2B.

इस्रोच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवकाश संस्था पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-4/RISAT-1A ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत(Lower Earth Orbit) तैनात करू शकते. यापूर्वी, मार्च 2022 मध्ये INS-2B चं प्रक्षेपण निश्चित करण्यात आल होतं. पण यावेळी तो EOS-4 सह लॉन्च केला जात आहे. EOS-04 उपग्रहाचं वजन 1710 किलोग्रॅम आहे. जे पृथ्वीपासून 529 किमी अंतरावर असलेल्या ध्रुवीय कक्षेत तैनात केले जाईल.

इस्रो या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत आणखी काही प्रक्षेपण करण्याच्या तयारीत आहे. पहिला EOS-4 असेल. यानंतर मार्चमध्ये PSLV-C53 वर OCEANSAT-3 प्रक्षेपित होईल. SSLV-D1 मायक्रोसॅट एप्रिलमध्ये लॉन्च होईल. तथापि, कोणत्याही प्रक्षेपणाची निश्चित तारीख शेवटच्या क्षणापर्यंत बदलली जाऊ शकते. कारण कोणत्याही लॉन्चपूर्वी अनेक प्रकारचे पॅरामीटर्स पहावे लागतात.

RISAT-1A हा रडार इमेजिंग उपग्रह आहे. हा रडार इमेजिंग आणि पाळत ठेवण्यासाठी वापरला जातो. हा उपग्रह पृथ्वीपासून 529 किमी उंचीवर तैनात करण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला उपग्रह 2009 मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. या उपग्रहाचा वापर टेहळणी आणि विकासकामांसाठी केला जातो. जसे की कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन.

हा उपग्रह नैसर्गिक आपत्ती आणि हवामानाशी संबंधित रिअल टाइम माहिती देतो. ही चित्रे इस्रोच्या केंद्रांना रिअल टाइममध्ये मिळतील. ज्याचा उपयोग जलस्रोत, पिकं, जंगलं, रस्ते-धरण-रेल्वे यांच्या बांधकामातही होऊ शकतो. एवढेच नाही तर या उपग्रहाचे शक्तिशाली डोळे आपल्या जमिनी आणि पाण्याच्या सीमांवरही नजर ठेवतील. त्याच्या मदतीने शत्रूच्या हालचालीही ओळखता येतात.

RISAT-1A चं मिशन 5 वर्षांचं असेल. या उपग्रहाचे वजन 1858 किलो आहे. या उपग्रहामध्ये सी बँड सिंथेटिक अपर्चर रडार आहे. जे कोणत्याही हवामानात भारताच्या काही भागांचं चित्रण करू शकते. या मालिकेतील हा सहावा उपग्रह आहे. 1979 पासून आतापर्यंत 37 पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. यापैकी दोन प्रक्षेपणाच्या वेळी अयशस्वी झाले.

इस्रोने यापूर्वी पाठवलेल्या कार्टोसॅट आणि रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट हल्ला आणि चीनसोबतचा गेल्या वर्षीचा वाद यावर बारीक नजर ठेवली होती. त्यामुळं शत्रू देशांची अवस्था बिकट होत चालली होती. आपल्या शत्रूंना भीती वाटते की भारत अंतराळातून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा