मुंबई, १७ नोव्हेंबर २०२० : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं सर्व कर्मचाऱ्यांना ई-कार्यालयाचा वापर करणं अनिवार्य केलं आहे. कोविड काळात घरून काम करण्याच्या संकल्पनेला आलेलं यश लक्षात घेता प्राधिकरणानं ई कार्यालयासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याला प्राधान्य दिलं आहे.
या संदर्भात ६०० कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आलं आहे तसंच फाईली आणि प्रकल्पांचा निपटारा करण्यासाठी ५०० कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची डिजीटल पडताळणी केली गेली आहे. या प्रक्रियेमुळे कामकाजात पारदर्शकता आणि गती येईल असं प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी म्हटलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी