बारामती, २ ऑक्टोबर २०२० : राज्य सरकारच्या परवानगीनंतर लाल परी पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज झाली आहे. सध्या वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता आवश्यक दक्षता घेवुन बारामती आगाराने देखील प्रवासी सेवा पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी नियोजन केले आहे.त्यासाठी प्रवाशांना नियमावली आखुन देण्यात आली आहे.त्यानुसार प्रवाशांना एसटी बसमध्ये प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बारामती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी याबाबत माहिती दिली.
शासनाच्या निदेर्शानुसार पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे.कोव्हीड-१९ च्या पर्श्वभूमीवर शासन निदेर्शानुसारची सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्यात येऊन प्रवासी वाहतुक करण्यात येत आहे. त्यानुसार बारामतीहून प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे, नीरा, फलटण, भिगवण, बीड, जालना, धुळे, कर्जत, राशीन, नगर, जामखेड या मार्गावर गाड्या धावणार आहेत. लॉकडाऊननंतर प्रथमच मोठ्या उत्साहाने एसटीने आपले कामकाज सुरू केले आहे.
प्रवाशांच्या सेवेसाठी कर्मचारी सज्ज असल्याचे गोंजारी म्हणाले. दरम्यान प्रत्येक प्रवाशाला मास्क घालणे बंधनकारक असून राज्य शासनाच्या सर्व निदेर्शांचे पालन करणे गरजेचे राहणार आहे. सर्व बसच्या तिकिटांचे दर लॉकडाउन अगोदर जे होते त्याच प्रमाणे असतील, बारामतीहून पुण्याला जाणाऱ्या गाड्या या विनाथांबा नसतील तर त्या प्रमुख स्थानकांवर थांबून पुण्याला जाणार आहेत.
बारामती आगाराचे एसटी बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे —एसटी बस वेळापत्रक पुढीलप्रमाणे -बारामती- स्वारगेट (मोरगाव मार्गे) : सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी.बारामती- स्वारगेट (नीरा मार्गे)
सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी. बारामती-नीरा : सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी.बारामती- भिगवण :
सकाळी सहा ते संध्याकाळी सातपर्यंत दर एक तासाने गाडी.बारामती-बीड : सकाळी दहा वाजता. बारामती-सातारा : सकाळी आठ व दुपारी दोन वाजता.
बारामती-धुळे : सकाळी सहा वाजता (कर्जत, राशीन, मिरज, नगर मार्गे).बारामती-जालना : सकाळी साडेदहा (जामखेड, बीड मार्गे).प्रत्येक तासाला बारामती – फलटण सकाळी ०६.०० ते सायं. ०७.०० वाजेपर्यंत प्रत्येक तासाला.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव