देव मंदिरात बंधिस्त व्हावे ही सरकारची भूमिका नाही – संजय राऊत

मुंबई, ३० ऑगस्ट २०२०: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, ” देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही”.  तसेच काल दिनांक २९ ऑगस्ट २०२० रोजी भाजप तर्फे करण्यात आलेल्या आंदोलनावर त्यांनी टीका केली आहे. तसेच ते म्हणाले, मंदिरे बंद करावी हा निर्णय केंद्र शासनातर्फे घेण्यात आला होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले?  राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वत्र कोरोनाचा प्रसार झालेला दिसून आला असे संजय राऊत यांनी सांगितले.

तसेच भाजपने घंटानाद केले त्यावरही संजय राऊत यांनी मत मांडले आहे. ते म्हणाले, भाजपने केलेल्या घंटानाद आंदोलन आधीच आमच्यापर्यंत व्यथा पोहोचली. लोकांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतले असतील तर भाजपने सरकारशी चर्चा करावी. मंदिर हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. तसेच भुतलावरची प्रत्येक क्षेत्र हे उदरनिर्वाहाचे साधन आहे, असं संजय राऊत मीडिया सोबत बोलताना म्हणाले.

तसेच मंदिरामुळे अनेकांचे उदरनिर्वाह थांबले आहेत. पुजारी असतात, मंदिराबाहेर हार फुले, प्रसादाची दुकाने असतात. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हाला ही आहे, असं संजय राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा