नांदगाव, नाशिक, ९ जानेवारी २०२३ : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील निमतळे शिवारात रात्री वेळी एका युवकाचा अपघाताचा बनाव करत त्याच्या मित्रांनीच खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. निमतळे शिवारात रात्री दहा वाजेदरम्यान वेहळगाव रस्त्याच्या कडेला एक अनोळखी अपघातग्रस्त युवक पडलेला एम्ब्युलन्स चालक शांतीनाथ राठोड यांना दिसला. त्याने पोलिस पाटीलला माहिती दिल्यानंतर नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर युवक मृत झाल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी अधिक तपास केला असता पैशांच्या देवाण- घेवाणीवरून वाद होऊन दोन मित्रांनीच त्याचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचे उघड झाले. या घटनेत मोटारसायकलचे कुठलेही नुकसान न होता चालकाच्या डोक्याला दगडाचा मार लागून जागेवरच मयत झाल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता सदर व्यक्ती दीपक रमेश कदम (वय ३०, राहणार साकोरा) असल्याचे समजले, याप्रकरणी पोलिसांनी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांना अटक केली आहे. मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना स्थळी अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय मनमाड यांनी भेट दिली.नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी,सहायक पोलिस निरीक्षक नितीन खंडागळे, संतोष बहाकर,मनोज वाघमारे, विनायक जगताप हे ही घटना स्थळी उपस्थित होते. रात्री खूनाची बातमी साकोरा परिसरात वार्यासारखी पसरताच नागरीकांची गर्दी जमली होती.याबाबत देवाजी बोरसे याने सदर घटना कशी घडली याबाबत पोलिसांना माहिती दिली निमतळे शिवारातील एका पडीक शेतजमिनीत घटना घडल्याचे सांगून मयत दिपकला मोटारसायकल वर घेऊन शेतजमीनीतून एक ते दीड की.मी.अंतर पार करून वेहळगांव रोडवरील मुळडोंगरी फाट्यावर नेऊन त्यांचे अंगावर मोटारसायकल टाकून पसार झाल्याचे सांगितले व अपघात झाल्याचा बनाव केला. यावर पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी भेट देऊन उशीरापर्यंत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे