अभिनेत्री ला नकार देणं चांगलंच भोवलं…..

भोपाल, २९ नोव्हेंबर २०२०: मंत्री आणि कलाकारांचे नातेसंबध जुने नाहीत. नेहमीच दोन्ही बाजूंनी एक समीकरण तयार झालेलं आसतं. बाॅलिवूड चित्रपट सृष्टी ची शंकुतला अर्थात अभिनेत्री विद्या बालनला आपला एक नकार चांगलाच महागात पडलाचे दिसत आहे. तिच्या या नकाराचा परिणाम चित्रपटाचा शुटवर झाला.

विद्या बालन तिचा आगामी चित्रपट ‘शेरनी’च्या शूटिंग मधे व्यस्त आहे. मध्य प्रदेशाच्या वन मंत्री विजय शाह यांनी विद्याला त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले आणि विद्याने काम असल्यामुळे त्यांना नकार दिला. त्यानंतर शूटिंग साठी पुढे आडचणी आल्या.

मध्य प्रदेशच्या वन विभागाची रितसर परवानगी काढल्या नंतर वन मंत्री विजय शाह यांनी विद्या बालन ला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते तिला भेटून जेवणाचे आमंत्रणही दिले. पण विद्या त्यावेळी महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने नकार दिला.

याचा परिणाम विद्याचा शुटवर झाला. असा आरोप करण्यात येत आहे की दुसऱ्या दिवशी जेव्हा चित्रपटाचं युनिट नेहमी प्रमाणे शूटिंग साठी निघाले तेव्हा त्यांच्या गाड्या आडवण्यात आल्या व शूटिंग ची परवानगी नाकारण्यात आली. अखेर मुख्य वन्यसंरक्षक नरेंद्र कुमार सनोदिया यांच्या आवाहनानंतर शुट पुन्हा चालू करण्यात आले.

“त्या दिवशी शूटिंग साठी जंगलामधे प्रमाणापेक्षा जास्त जनरेटर नेण्यात आले होते म्हणून शूटिंग ला नाकारण्यात आले होते. दुसरा कोणताही हेतू नव्हता”.असे वन मंत्री विजय शाह यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा