मुंबई, १ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमीसाठी आंनदची बातमी म्हणजे इंडियन प्रिमियर लीग अर्थात जगप्रसिद्ध IPL ला परवानगी मिळाली असून अनेक संघ हे तयारीला लागले आहेत.यातच आता कोणता संघ या वर्षीची हि लीग जिंकतो याची भविष्यवाणी आणि तर्क लावले जात आहेत.
IPL च्या हंगामात सध्या सर्वात जास्त चर्चा हि मुंबई इंडियन्स संघाची होत असून या वर्षीचा हा IPL चा किताब जिंकण्याचा प्रबळ दावेदारी मध्ये हा संघ अव्वल स्थानी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात हा संघ विजयी होऊ शकतो अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यानीं केली आहे.तर पुढे ते म्हणाले रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ हा अत्यंत समतोल आहे.त्यांची फलंदाजी शेवट पर्यंत आहे.तर या स्पर्धेच्या इतिहासातही त्यांनी वर्चस्व राखले आहे. ज्यामुळे तेच यंदा विजेतेपद मिळवतील असा विश्वास वाटतो.अर्थात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सही स्पर्धेत कायम दबदबा निर्माण करते.त्यामुळे याच दोन संघात अंतिम सामना होईल असे मला वाटते असेही हॉग म्हणाले.
तर मुंबई इंडियन्स हा लिलावात अर्धा विजय मिळवतो अशी प्रतिक्रिया समलोचक अकाश चोप्राने दिली आहे. पुढे तो म्हणाला की मुंबई संघ हा नेहमीच मोठे आणि चांगले खेळाडू विकत घेण्याच्या मागे असतो ज्या मुळे तो आधीच एक तगडा संघ म्हणवतो. तसेही हंगाम सुरु होण्याच्या आधीच मुंबई संघाला हा किताब जिंकण्याचे प्रबळ दावेदार मानले जात आहे तर आत्ता पर्यंत मुंबई इंडियन्स संघाने IPL लीग चा ४ वेळा किताब जिंकला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी