छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यात भारत-तिबेट सीमा पोलिस दलाच्या (आयटीबीपी) जवानांमध्ये गोळीबार झाला. या घटनेत आयटीबीपीच्या ६ जवानांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जवान जखमी असल्याचे बोलले जात आहे. सैनिकांकडून हा गोळीबार करण्याचे कारण समजू शकले नाही.
बस्तर प्रांताचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी म्हणाले की, नारायणपूर जिल्ह्यातील काडेनर गावात आयटीबीपीच्या ४५ व्या बटालियनच्या छावणीत सैनिकांमध्ये आज गोळीबार झाला. या गोळीबारात सहा सैनिकांचा मृत्यू झाला असून सुमारे चार सैनिक जखमी झाले आहेत. सुंदरराज यांनी सांगितले की आज आयटीबीपीच्या जवानानं छावणीत गोळीबार सुरू केला. या घटनेत पाच सैनिकांचा मृत्यू झाला. मात्र, नंतर हल्ला करणार्या जवानलाही गोळ्या घालण्यात आले.
पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले की, सैनिक आणि जखमी सैनिकांचे मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले की या घटनेनंतर नारायणपूर जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक मोहित गर्गही घटनास्थळी रवाना झाले आहेत. या संदर्भात अधिक माहिती मागितली जात आहे.