इतिहासकार रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात आज (दि.१९) देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरु आहे.
बंगळुरु येथे इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथे जवळपास ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आंदोलन करणाऱ्या अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलकांनी शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरु पोलिसांनी या आंदोलनासाठी मंजूरी दिली नव्हती.
आंदोलक रस्त्यावर उतरणार असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पोलीस तैनात करण्यात आले होते. रामचंद्र गुहादेखील आंदोलकांमध्ये सहभागी झाले होते.
यानंतर पोलिसांनी कारवाई करत जवळपास ३० जणांना ताब्यात घेतले. यावेळी काही आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा