मुंबई : आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित ‘पानिपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. एकिकडे बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत हा चित्रपट कितपत मजल गाठतो हे पाहत असतानाच आता या चित्रपटाला जाट समुदायाकडून विरोध करण्यात येत आहे.
शनिवारपासूनच या चित्रपटाविरोधात समुदायाने आवाज उठवला असून, आशुतोष गोवारिकर यांच्या पुतळ्यातं दहन केलं. शिवाय ‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार त्यांनी चित्रपटाचावर बंदी आणण्याचीही मागणी केली आहे. चित्रपटातून वास्तवाची मोडतोड करत काही प्रसंग दाखवण्यात आले आहेत.