जगातील महाभयंकर आजार व नागरिकांचा मृत्यू

सध्या जगभरात कोरोना व्हायरसमुळे काही हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. संयुक्त राष्ट्रांसह जागतिक आरोग्य संघटनेने जगाला याबाबत सतर्क केले असून सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या विषाणूचा सामना करण्यासाठी कोणतेही औषध मिळालेले नाही. दरम्यान, कोरोनापूर्वी ब्लॅक डेथ, एशियन फ्लू, हाँगकाँग फ्लू, कॉलरा या आजारांनी कोट्यावधी लोकांचा जीव घेतला होता. त्यामुळे या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. आपण पाहू यात जगभरातील महाभयंकर आजार व त्यातुम झालेलं नुकसान…

■ ब्लॅक डेथ : याला Pestilence किंवा ग्रेट प्लेग किंवा ब्लॅक प्लेग म्हणून देखील ओळखले जाते. ज्यामुळे युरोपमध्ये १३४७-१३५३ दरम्यान ७ ते २० कोटी लोकांचा मृत्यू झाला. जहाजातून काही लोक क्रिमिया येथे आल्याचे म्हटले जात होते. त्यांच्यासमवेत काळे उंदीरही काळ्या जहाजात होते. हळूहळू ते युरोपमध्ये पसरले. असे म्हटले जाते की यामुळे युरोपमधील सुमारे ३० ते ६० टक्के लोकसंख्या नष्ट झाली होती.

■ स्पॅनिश फ्लू :१९१८-२० च्या दरम्यान जगातील अनेक देश स्पॅनिश फ्लूच्या कचाट्यात सापडले होते. जगभरात सुमारे ५० कोटी लोकांना याचा फटका बसला. त्याच वेळी सुमारे १.५ कोटी ते ५ कोटी लोक मरण पावले. जानेवारी १९१८ मध्ये अमेरिकेच्या कॅन्‍सास येथे त्याचे पहिले प्रकरण समोर आले होते.

■एशियन फ्लू : २० व्या शतकातील एशियन फ्लू ही सर्वात मोठी महामारी होती. १९५० मध्ये, प्रथम ते इन्फ्लूएंझा ए H2N2 म्हणून ओळखले गेले. जवळपास ७ वर्षे याने लोकांचा जीव घेतला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभरात २० लाख लोक मरण पावले होते. त्याचा उद्रेक चीन मधूनच झाला होता.

■ हाँगकाँग फ्लू : १९६८ हा इन्फ्लूएन्झा विषाणूमुळे १० लाखाच्या आसपास लोकांचा मृत्यू झाला. त्याची उत्पत्ती देखील हाँगकाँगमध्येच झाली होती. याचे पहिले प्रकरण १३ जुलै १९६८ रोजी समोर आले होते. एकट्या हाँगकाँगमध्ये ५ लाख लोकांना याचा फटका बसला होता. अमेरिकेत त्यांची संख्या ३४ हजारांच्या जवळपास होती.
■ कॉलरा : १८४६-६० दरम्यान तिसरा हैजा किंवा तिसरा कॉलऱ्याची सुरुवात भारतापासून झाली होती. १९१०-१ मध्ये भारतात सुरू झालेल्या सहाव्या कॉलरामुळे संपूर्ण जगात सुमारे आठ लाख लोक मरण पावले होते. १८८९-१८९० मध्ये फ्लू H3N8 विषाणूमुळे सुमारे १० लाख लोक मरण पावले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा