पर्वतीय प्रदेशांचा जगाच्या शाश्वत विकासामध्ये असलेला महत्त्वाचा सहभाग दर्शवण्यासाठी अनेकदा पर्वत रांगाचा उपयोग केला जातो.नुकताच आपण भारतात जागतिक पर्वत दिन साजरा केला. त्यानिमित्त जाणून घेऊ जगातील सर्वात उंच पर्वतरांगा…
■ माउंट एव्हरेस्ट : हे जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८८४८ मीटर (२९,०२९,फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) या देशांच्या सीमेजवळ आहे. नेपाळमध्ये याला सगरमाथा म्हणून ओळखतात, तर तिबेट मध्ये चोमो लुंग्मा म्हणतात.
■ के 2 : याची उंची ८६११ मीटर इतकी आहे. हे शिखर सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. पाक-चीनच्या सरहद्दीजवळ आहे. गिर्यारोहकांमध्ये के २ पर्वताला जंगली मानले जाते, कारण चढाईसाठी हे शिखर जगातील सर्वात अवघड शिखर मानले जाते. आकडेवारीनुसार या पर्वतावर गिर्यारोहण करणारे ४ पैकी १ गिर्यारोहकाचा मृत्यू होतो.
■ कांचनगंगा: हे हिमालय पर्वतांतील एक उंच पर्वतशिखर आहे. हे जगातील माउंट एव्हरेस्ट व के२ नंतरचे तिसरे सर्वात उंच शिखर असून भारताच्या सिक्कीम राज्यात आहे. भारतातील सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची ८५८६ मीटर (२८,१६९ फूट) इतकी आहे.
■ ल्होत्से : हा पृथ्वीवरचा चौथा अत्युच्च पर्वत असून तो दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून ८५१६ मीटर आहे. ल्होत्से पर्वत तिबेट व नेपाळचा खुम्बू भागाच्या सीमेवर आहे.
■ मकालू : हे हिमालयातील एक शिखर आहे. त्याची उंची ८४६३ मीटर असून ते जगातील पाचव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखरदेखील ‘माउंट एव्हरेस्ट’च्या हिमालयीन रांगांमध्ये वसलेले आहे.
■ चो ओयू : हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८२०१ मीटर असून, हे पृथ्वीवरील ६ व्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर आहे.
■ धवलगिरी : हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच (उंची ८१६७ मीटर) शिखर आहे. इ.स. १९६० साली स्विस, ऑस्ट्रियन व नेपाळच्या संयुक्त मोहिमेने हे ‘माउंट धौलागिरी’ वा ‘माउंट धवलगिरी’ शिखर सर केले.
■ मानसलू : हिमालयातले मानसलू (उंची ८१६३ मीटर) हे जगातील ८ व्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. हे शिखर पश्चिम नेपाळमध्ये आहे. या शिखराचे नाव संस्कृत भाषेतील आहे. स्थानिक नागरिक ‘मानसलू’ला ‘कुटांग’ असेही म्हणतात.
■ नंगा पर्वत : हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील ९ व्या क्रमांकाचा पर्वत आहे. त्याच्या शिखराची उंची ८१२६ मीटर इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जात असे.
■ अन्नपूर्णा : हिमालयातील ५५ किमीच्या अन्नपूर्णा पर्वतरांगेतील अन्नपूर्णा १ – उंची ८०९१ मी. हे सर्वोच्च शिखर आहे. हे मध्य नेपाळमध्ये आहे.
अन्नपूर्णा या पर्वतताचा शोध कोणी लावला आहे