जगातील सर्वात वयोवृद्ध जिंवत महिला केन तणाका

जपान : जगातील सर्वात वयोवृद्ध महिला केन तनाका यांनी नुकताच दक्षिण जापानमधील आपल्या नर्सिंग होममध्ये ११७ वा वाढदिवस साजरा केला. २ जानेवारीला केन यांनी नर्सिंग होममधील मित्र-मैत्रिणी आणि कर्मचाऱ्यांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला.
मागच्या वर्षी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केन यांना जगातील सर्वात वयोवृद्ध जिवंत व्यक्ती म्हणून घोषित केले होते. केन यांचा जन्म १९०३ मध्ये झाला आहे. व हिडेओ टंका यांच्यासोबत वर्ष १९२२ मध्ये त्यांनी लग्न केले होते. या जोडप्याला ४ मुले असून एक मुल त्यांनी दत्तक घेतले आहे.

केन तनाका यांचे हे विक्रमी वय जापानसाठी एक प्रतिकात्मक विषय बनले आहे. कारण मागील काही वर्षात जापानमधील जन्मदर सातत्याने घसरत चालला आहे.
ज्यामुळे तेथे कामासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत असून, यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा