जगातलं नववे आश्चर्य…चीनमधील कड्यावरचा रस्ता

आपण अनेक ठिकाणी फिरायला जातो. त्यावेळी अनेक प्रकारचे घाट, रस्ते, पहायला मिळवितात. परंतु आपल्याला हे माहीत आहेत का की , चीन मध्ये असा एक रस्ता बांधलेला आहे. जो डोंगराच्या एका कड्यावर बांधलेला आहे. त्यामुळे त्याला जगातील ९ आश्चर्य बनण्याचा मान मिळालेला आहे. हा रस्ता समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंच आणि १.२किलोमीटर लांब आहे. त्याच्या अवघड आणि धोकादायक बांधकामामुळे त्याचा समावेश आश्चर्यांमध्ये झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चीनच्या हेनान प्रांतातील हुक्षियान काऊंटी येथे हे गुओलियांग गाव आहे. हे गाव बाकी जगापासून वेगळे पडले आहे. या डोंगरावरून खाली येण्यासाठी गावकऱ्यांना तीक्ष्ण चढ-उतार असलेली दरी ओलांडावी लागत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी १९७२ साली स्वतःच रस्ता खोदण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे शेन मिंगक्षिन या गावकऱ्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी रस्ता खोदायला सुरूवात केली. कोणतेही प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांच्यासाठी या रस्त्याचे बांधकाम अत्यंत धोकादायक होते.
या कामात काही जणांचा मृत्यूही झाला. अखेर १९७७ साली या रस्त्याचे काम पूर्ण झाले.
आता हा रस्ता पर्यटन केंद्र बनला असून हे काम पूर्ण करणाऱ्या १४ जणांची कथा ही पर्यटकांसाठी आकर्षण बिंदू ठरली आहे. असे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा