राष्ट्रपतीपदासाठीचे मतदान पार पडल्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनखर यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. यावेळी पंतप्रधान मोदी, जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह उपस्थित होते. त्यांच्या विरोधात मार्गारेट अल्वा यांचे नाव दाखल करण्यात आले आहे.
जगदीप नड्डा यांच्याविषयी न्यूज अनकटने घेतलेला आढावा
पेशाने वकिल असलेले जगदीप धनखर यांचा जन्म राजस्थानमधील गावकिथाना जिल्ह्यातील झुंझून या गावी झाला. शिक्षणानंतर त्यांनी संपूर्ण वेळ राजकारणासाठी दिला.
जगदीश धनखर हे १९८८ मध्ये राजस्थान बार काऊंसिलचे सभासद म्हणून निवडून आले तर १९८९ मध्ये झुंझुनु येथील लोकसभेत ते निवडून आले. जेव्हा ते बार असोसिएशनचे सदस्य निवडून आले, तेव्हा ते सर्वात कमी वयाचे उमेदवार म्हणून त्यांनी मान मिळवला.
याचबरोबर लोकसभा आणि विधानसेभत त्यांनी राजस्थानर्फे विविध समित्यांचे काम पाहिले. केंद्रीय मंत्री असताना धनखर हे युरोपियन संसदेतील संसदेचे गटनेते म्हणून शिष्टमंडळाचे घटक म्हणून काम पहात होते.
३० जुलै २०१९ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी धनखर यांना पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून घोषित केले होते. जगदीप धनखर यांनी राजस्थान मधल्या जाट समाजाला तसेच इतर मागास वर्गीय समाजाला ओबीसीचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी सहभाग घेतला होता.
नुकताच धनखर यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून अर्ज भरला असून त्यांना भाजपचा संपूर्ण पाठिंबा आहे. आता केवळ वाट पहायची आहे ती… निकालाची…जर धनखर हे उपराष्ट्रपती झाले तर पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून मुक्तार अब्बास नकवी यांचा नंबर लागू शकतो आणि मग ममता बॅनर्जीचें टेन्शन हलके होऊ शकते, असा सूर राजकारणातून ऐकायला येत आहे. मग कोणाची सरशी आणि कोण उरशी हे पहाणं महत्त्वाचं ठरेल. त्यावर समीकरणं आणि गणितं बदलतील, हे मात्र खरं.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस