जागतिक एड्स दिन विशेष

एड्सचा विषाणू आणि आकडेवारी..?

एच.आय.व्ही/ एड्स बाबत आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. एड्स पूर्वी अस्तित्वात होता का? हा आजार नक्की आला कुठून आहे? याचा इतिहास काय आहे? आज याचा देखील विचार करूयात…

एड्सची उत्पत्ती ही १९८० साली झाली असून शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एड्सची उत्पत्ती ही किन्शासा शहरात झाली असून हे शहर आता कॉन्गो गणराज्याच्या नावाने ओळखले जाते.

असे म्हटले जाते कि, निर्मितीनंतर तब्बल ३० वर्षांनी या रोगाची माहिती झाली. ‘सायन्स जनरल’ या नियतकालिकात याबाबतचा संशोधन लेख प्रकाशित करण्यात आला होता. त्यानुसार, शास्त्रज्ञांनी एड्सच्या विषाणूच्या जेनेटीक कोडच्या नमून्यांचे संशोधन केले. यात हे विषाणू किन्शासा शहरात निर्माण झाल्याचे समोर आले होते.

वेशाव्यवसाय, वाढती लोकसंख्या आणि दवाखान्यात वापरली जाणारी सुई या गोष्टी एड्सचे विषाणू वाढवण्यास कारणीभूत आहेत.

माहितीनुसार, एड्स हा चिंपांजी व्हायरसचे परिवर्तित रूप आहे. हा सिमियन इम्युनोडिफिसिएंसी व्हायरसच्या नावाने ओळखला जातो. किन्शासा शहर हे बुशमीटची मोठी बाजारपेठ होती. त्यामुळे संक्रमित झालेल्या रक्तामुळे हा व्हायरस मनुष्याच्या शरीरात आला असण्याची शक्यता आहे.

हा व्हायरस विविध माध्यमातून पसरला. त्याने सुरुवातीला चिंपांजी, गोरिल्ला आणि शेवटी माणासाच्या शरिरात प्रवेश केला. दरम्यान एचआयव्ही-१ ने कॅमरून शहरातील लाखो लोकांना संक्रमित केले. त्यानंतर हा व्हायरस जगभरात पसरला.

AIDS (Acquired Immune Deficiency Syndrome) एड्स म्हणजे एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग होणे. यामध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.

माहितीनुसार, गेल्या काही वर्षात एचआयव्ही बाधित रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे निर्दशनास येत आहे. सध्या जगभरात एचआयव्हीची काय परिस्थती आहे? किती लोक बाधित आहेत? किती लोकांना नव्याने लागण झाली? किती लोक मृत्यूमुखी पडले? याबाबत जाणून घेऊयात…

unaids या संकेत स्थळानुसार एचआयव्हीची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.

● ३७.९करोड लोक एचआयव्ही (२०१८ अखेर) सह जगत होते.
● १७ लाख लोकांना एचआयव्हीची (२०१८ अखेर) नव्याने लागण झाली.
● ७ लाख ७० हजार लोकांचा एड्स-संबंधित आजारांमुळे (२०१८अखेर) मृत्यू झाला.
● ३.२करोड लोक साथीचे रोग (२०१८ अखेर) सुरू झाल्यापासून एड्सशी संबंधित आजारांमुळे मृत्यूमुखी पडले.
NACO च्या आकडेवारीनुसार देशातील आकडेवारी अशी :

● देश : ८२हजार ते १ लाखापर्यंत रुग्णांना एचआयव्हीची लागण
● राज्य : २१हजारावर एचआयव्हीचे रुग्ण

रक्तसंक्रमणातून एचआयव्ही लागण झालेले रुग्ण* : (२०१८-१९)

● उत्तर प्रदेश : २४१
● प. बंगाल : १७६
● महाराष्ट्र : १६९
● गुजरात : १३९

देशपातळीवरील आकडेवारी :

● २०१६-१७ : १ हजार ५४१
● २९१७-१८: १ हजार ४०६
● २०१८-१८ : १हजार ३४२

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा