कन्नड, छत्रपती संभाजीनगर ३० डिसेंबर २०२३ : कन्नड येथे मोठ्या उत्साहात जय भीम दीन साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील मकरणपुर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम सभा ३० डिसेंबर १९३८ ला झाली, त्या अनुषंगाने कन्नड नगरीला महत्त्वाची पार्श्वभूमी मानली जाते.
त्याकाळात कन्नड नगरीचे समाजसेवक भाऊसाहेब मोरे यांनी सभेचे आयोजन करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सभेला आमंत्रित केले होते. त्याच दिवसापासून कन्नड नगरीच्या मकरंदपूर येथून जय भीम चा जयघोष करण्यात आला. तेव्हापासून जय भीम या संघर्षवादी वाक्याची सुरुवात झाली. आज संपूर्ण भारतात जय भीम या नावानेच समाज एकजूट होत आहे असे प्रतिपादन यावेळी परिषदेमध्ये डॉक्टर भिकू हर्ष बोधी महाथेरो यांनी केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : रविंद्र खरात