जय श्रीराम सेना हिंदुस्थान महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदी सुमित जाधव

15

पुणे, २ जानेवारी २०२१: भाजपा युवा मोर्चा शिवाजीनगर मतदारसंघ चे चिटणीस सुमित जाधव यांची जय श्री राम सेना हिंदुस्तान महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांची संपर्कप्रमुख पदी निवड झाली. ते आधी जय श्री राम सेना हिंदुस्तान चे पुणे शहर सचिव होते. नंतर त्यांचे काम पाहता त्यांना महाराष्ट्र राज्य च्या बॉडी वर घेण्यात आले. सुमित जाधव हे आधी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी पण काम करत होते. परिषदेतून ते खूप पुढे आले आणि आता समाजकारण करत आहेत.

सुमित जाधव यांनी हिंदू युवकांसाठी सल्ला दिला आहे. ते बोलतात, ऊठ हिंदु युवक, ऊठ. थांबू नकोस. तू आठव तुझे पराक्रम. हिंदुत्व हाच तुझा रक्तगत स्वभाव. भारतमातेने तुझे उग्र स्वरूप इतिहासात पाहिलेले आहे. आता परत एकदा तुला मूळ स्वरूपात यावेच लागेल. तुझ्याच स्वभाव धर्माचा ” उपयोग करून घेत आपल्याच लोकांनी केलेला विश्वासघात ध्यानात घेऊन निर्णय घेण्यात उशीर करू नकोस. कोणावर किती विश्वास ठेवावा हे अनुभवातून स्मरण करुन कोणास कुठे बसवावे हे नक्कीच समजून घेऊन वागावे लागेल. दिसते तसे नसते म्हणून जग फसते. आपला कोण हे जाण, आपल्यात कोण फूट पाडित आहे हे जाणून घेऊन योग्य स्थळी बसव हिंदु-धर्मद्रोही जनास.

इतिहासातुन शिकलो आपण. आता नव इतिहास घडवावा लागेल. समर्थ नैतागणास. देशासाठी – धर्मासाठीच साथ देवूया आपण. जय श्री राम, जय शिवराय, जय हिंदुराष्ट्र.

न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड