कर्जत, दि. २९ जून २०२०: कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे गांव म्हणून जलालपूर या गावाकडे पाहिले जाते. गावात अनेक समस्यांना नागरिक हे सामोरे जात आहेत. त्या मध्ये मानवाला जगण्यासाठी लागणारे महत्वाचे म्हणजे जल (पाणी) या साठी जलालपूर या गावात जुना एक बोर आणि हातपंप आहे. याचं हातपंपावर गावातील अर्ध्याहुन ही अधिक नागरिक हे याचं हातपंपाच पाणी हे पिण्यासाठी आणि रोजच्या वापरात त्यांचा वापरही करत असतात.
सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने गावातील वीज पुरवठा हा वेळोवेळी वीजेच्या कामासाठी खंडीत होत असतो. ज्या वेळी गावात वीज नसते किंवा बोरचा काही खराब झाली, तर याचं हातपंपावरून संपुर्ण गावातील लोक हे पाणी वापरत असतात. हातपंप हा संपुर्ण गंजुन सडलेल्या अवस्थेत आहे. गंज लागुन सडल्यामुळे नागरिकांना या ठिकाणी पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांची पायपीट होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.विशेष म्हणजे हा हातपंप हा दलित वस्ती मधील आहे.
हातपंपाच्या शेजारीच काटाड्या असल्याने त्यांचा ही नागरिकांना धोका असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाळ्याच्या दिवसात त्या ठिकाणी साप ही पाहण्यास मिळत असल्याचे कांबळे गलीतील नागरिकांनी न्युज अनकटशी बोलताना सांगीतले. शासकीय पाहणीसाठी जो व्यक्ती येत असतो त्या कडे तक्रार केली असता त्यांने सांगीतले की जलालपूर ग्रामपंचायत ही या कडे दुर्लक्ष करीत आहे.
हातपंप गंज लागुन सडलेल्या अवस्थेत पाहण्यास मिळत असल्या मुळे नागरिकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेशी तक्रार करूनही कोणत्या ही प्रकारचा प्रतिसाद मिळात नसल्याने जलालपूरकर हे पिण्याच्या पाण्यासाठी माञ ञस्त झाले असल्याचे पाहण्यास मिळत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष