जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये तीन महिन्याच्या चिमुकल्याची हत्या

12

जालना, दि.२५ मे २०२०: जालना जिल्ह्यातील अंबड शहरातील आंबेडकर नगरमध्ये एका तीन महिन्याच्या चिमुकल्याला पाण्याच्या टाकीत टाकून हत्या केल्याची घटना उघडकिस आली आहे.

रविवारी( दि.२४) रोजी रात्री अंबड येथील आंबेडकर नगरमधील विजय जाधव आणि पायल जाधव हे आपल्या बाळासोबत घराबाहेर झोपले झोपे. पहाटे तीन वाजता त्या बाळाची आई पायल उठली, मात्र तिला बाळ झोळीत दिसले नाही.त्यानंतर या संदर्भात पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर बाळाचा शोध सुरू झाला.

शोधा शोध केल्यानंतर पोलिसांना बाळाचा मृतदेह घराबाहेर असलेल्या प्लास्टिकच्या टाकीत आढळून आला. घटना स्थळावरून पोलिसांना अद्याप काही पुरावा मिळाला नसून शोध घेण्याचे काम सुरू आहे.

बाळाची आई पायल जाधव यांच्या फिर्यादीवर अज्ञात आरोपीविरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अंबड परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: