अवैध धारदार हत्यार बाळगणारा आरोपी जेरबंद, जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

18

जालना ७ मार्च २०२४ : जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना आणि पोलीस अंमलदार हे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती घेत असताना मिळालेल्या माहितीवरून, त्यांनी शेख कलीम शेख शरीफ रा. वाल्मीकनगर जालना याला दोन धारदार शस्त्रासह ताब्यात घेतलंय.

संशयित आरोपी शेख कलीम शेख शरीफ हा त्याच्या जवळ धारदार हत्यार कोयता व गुप्ती बाळगुन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरुन पथकाने शेख कलीम शेख शरीफ याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहत्या घरी मिळुन आला. सदर संशयित आरोपीकडुन मानवी जिवीतास धोका निर्माण होणारे धारदार टोकदार असलेली एक गुप्ती व कोयता जप्त करण्यात आली आहे. त्याकडे मिळुन आलेल्या अवैध हत्यार संबंधी त्याचे विरुध्द पोलीस हवालदार गोपाल गोशिक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांचे तक्रारी वरुन पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे कलम ४/२५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा