जालना जिल्हा परिषदेत आज पेंशन अदालतीचे आयोजन

15

जालना २१ ऑगस्ट २०२४ : छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना उपायुक्त यांनी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी निकाली काढण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानूसार आज दुपारी जालना जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांच्या दालनात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

पेंशन अदालतीसाठी प्रलंबित प्रश्न अर्ज, पोस्टाने, ई-मेल किंवा हस्तपोच जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात सादर करावेत. पेंशन अदालतीसाठी सेवानिवृत्तांनी, कुटुंबनिवृत्ती वेतन धारकांनी प्रकरणाच्या माहितीसह उपस्थित रहावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा