जम्मू, २० डिसेंबर २०२२ : जम्मू-काश्मीरमधील शोपियान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. शोपियानच्या मुंझ भागात ही चकमक सुरु असून या चकमकीत लष्कर या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचे तीन दहशतवादी ठार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानच्या मुंझ भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर पोलिसांसह सुरक्षा दलाच्या पथकाने तपास मोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दरम्यान, सध्या सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम तीव्र केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीही दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील वाथू शिरमल भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.