फलटण, 31 मार्च 2022: मॅग फाऊंडेशन फलटण व माऊली फाउंडेशन काळबादेवी संचालित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर चे दिनांक २७.०३.२०२२ या दिवशी मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , सभापती विधान परिषद , महाराष्ट्र राज्य, थोर शिक्षणतज्ञ सर मा. डॉ. मो. स. गोसावी ,सेक्रेटरी गोखले एज्युकेशन सोसायटी , नाशिक , मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्ष सातारा जिल्हा परिषद यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाले. या उद्घाटन समारंभास विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉ. श्री. शिवकुमार उत्तुरे , इंडियन मेडिकल कॉऊन्सिलचे माजी उपाध्यक्ष डॉ. श्री. अनिल पाचणेकर , रहेजा आणि फोर्टिस हॉस्पिटलचे प्रमुख पॅथॉलॉजिस्ट डॉ. श्री. सुरेन्द शिंगणापूरकर , माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. एच. एस. शिंगण ,फलटण नगरीतील सेवाभावी डॉ. श्री. शरद पोरे आणि जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.
मॅग फाउंडेशनचे सर्वेसर्वा श्री अनिल मोहटकर यांनी सन्मानित अतिथींचे स्वागत केले व माऊली फाउंडेशन काळबादेवीचे कार्याध्यक्ष ॲड विश्वनाथ टाळकुटे यांनी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे उद्दिष्ट सांगितले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजिवराजे नाईक निंबाळकर यांनी श्री अनिल मोहटकर व माऊली फाउंडेशनच्या ह्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी, शिक्षण महर्षी व फलटणचे सुपुत्र डॉ मो.स.गोसावी सर यांनी माऊली फाउंडेशनला १ लाख रुपयांची देणगी दिली आणि फलटण येथील ब्राम्हण गल्ली मधील वास्तू मॅग व माऊली फाउंडेशनच्या पुढील विस्तारासाठी देण्याची तयारी दाखविली आहे. महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिलचे अध्यक्ष सुप्रसिद्ध डॉ. श्री. शिवकुमार उत्तुरे , इंडियन मेडिकल काऊन्सिलचे माजी उपाध्यक्ष डॉ. श्री. अनिल पाचणेकर यांनी जनसेवा उपक्रमाचे कौतुक केले आहे आणि सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे .रहेजा आणि फोर्टिस हॉस्पिटलचे प्रमुख पॅथॉलॉजिस्ट डॉ. श्री. सुरेन्द शिंगणापूरकर यांनी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर मधील अत्यंत आधुनिक आणि सुसज्ज मशिनरी यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत सर्वप्रथम पॅथॉलॉजिचा विभाग सुरु केला असून डॉ. सौ. दिव्या रसाळ एम.डी. पॅथालॉजिस्ट या विभागाची सेवा पाहणार आहेत. जैन सोशल ग्रुप व फलटण मधील दोशी गुणवरेकर परिवारातर्फे श्री अनिल मोहटकर, ॲड विश्वनाथ टाळकुटे व डॉ सिंगण यांचा फलटणच्या नागरिकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. ह्या कार्यक्रमास माऊली फाउंडेशनचे पदाधिकारी व इंदोर , पुणे, मुंबई येथील कार्यकर्ते आणि फलटण मधील नागरिक उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरला उस्फुर्त प्रतिसाद लाभला. जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर च्या माध्यमातून फलटण तालुक्यातील नारंगी ,केशरी शिधाधारक , ६० र्षावरील जेष्ठ नागरिक आणि मॅग आणि माऊली फाउंडेशनचे सभासद यांना ५०% सवलतीच्या दराने सर्व पॅथॉलॉजिच्या सेवा दिल्या जाणार आहेत. तसेच जेष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना नाममात्र फी आकारून घरपोच सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी २४ तास अगोदर (संध्याकाळी ५.०० वाजे पर्यंत )सेंटरच्या. ९५२९२३३०६७ नंबरवर फोन करून नोंदणी केल्यास रक्तलघवीचे नमुने घरी येऊन घेतले जातील आणि रिपोर्ट वॉट्सअप / ईमेल द्वारे डिजिटल स्वरूपात दिले जाणार आहेत.
वेळीच अचूक निदान झाल्यास आणि आरोग्यविषयक तपासण्या केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या टाळता येत असल्याने नागरिकांना हेल्थकार्ड दिले जाणार असून नागरिकांच्या रिपोर्टचे वर्गीकरण करून त्यांना योग्य आहार आणि व्यायाम इत्यादी सल्ले तज्ज्ञांकडून दिले जाणार आहेत. या जनसेवी उपक्रमाचा लाभ फलटण तालुक्यातील गरजूंनी घ्यावा.
न्यूज अनकट प्रतिनिधी