जपान १६ जुलै २०२२ : जपान हा प्रगत देशांमध्ये गणला जाणारा देश आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान हा कायम पुढे चालणारा आणि वेगवान देश म्हणून ओळखला जातो. आता जपानने पुढे पाऊल टाकत चंद्रावर झेप घेण्याचा प्लॅन केला आहे. कुठल्याही स्पेस शिपपेक्षा थेट बुलेटट्रेनने चंद्राचा वेध घेण्याची जपानची योजना आहे. त्याचबरोबर मंगळावरदेखील बुलेट ट्रेन नेण्याचा जपानचा मानस आहे. जपानकडे अद्यावत तंत्रज्ञान आहे. त्यामुळे याच तंत्रज्ञानाचा वापर करत जपान आता पृथ्वी ते चंद्र आणि पृथ्वी ते मंगळ हा प्रवास बुलेट ट्रेनने करण्याची तयारी करत आहे.


एकीकडे अमेरिका आणि चीनदेखील चंद्रावर सृष्टी स्थापन करण्याच्या विचारात आहे, तर रशिया देखील चंद्रासाठी संयुक्त मोहिमेची योजना करत आहे.
जपान मात्र चंद्रावर सृष्टी वसवण्यासाठी काम करत आहे. ज्यासाठी चंद्रावर एक काचेचे घर बांधण्यात येईल. अर्थात ते तयार घर केवळ चंद्रावर ठेवावे लागले. त्या निवासस्थानात मानव राहू शकेल. जेणे करुन त्याला चंद्रावर पृथ्वीप्रमाणेच वातावरण असल्याचा आनंद घेता येईल. चंद्रावर मुळातच गुरुत्वाकर्षण शक्ती कमी आहे. त्यामुळे मानवी हाडांची झीज होण्याचे प्रमाण चंद्रावर जास्त असू शकते. त्यामुळे चंद्रावर पृथ्वीप्रमाणे घर करुन त्यानुसार तेथे पृथ्वीप्रमाणे वस्ती निर्माण करण्याचा जपानचा मानस आहे.
जर जपानचा हा पर्याय यशस्वी झाला, तर मानवासाठी चंद्रावर वेगळी सृष्टी निर्माण करता येईल. मानवाला राहण्यासाठी मानवाला वेगळ्या ग्रहाचा पर्याय निर्माण होईल. तर २१ व्या शतकाच्या शेवटी कदाचित मानवासाठी हा पर्याय नक्कीच उपयुक्त असू शकेल. मात्र या घरातही स्पेससूट वापरावा लागेल आणि त्यानुसार वातावरणाशी जुळवून घ्यावे लागणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.
जपानचा हा प्रयत्न भविष्यात यशस्वी झाला, तर पृथ्वीप्रमाणेच चंद्रावरही काही वर्षात गजबजाट पहायला मिळेल. ही नक्कीच उज्वल तंत्रज्ञानाची सुरुवात असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस