Jaran Marathi movie based on black magic: मराठी इंडस्ट्रीत भयावह चित्रपट पहायला गेल तर थोडेच आहेत. परंतु त्या चित्रपटांची भयाची परिभाषाच वेगळी आहे. अशातच भयाची नवीन परिभाषा घेऊन ‘जारण’ हा नवाकोरा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर देखील खुप गाजला. ट्रेलर मध्ये अभिनेत्री अमृता शुभा एका वाड्यात पाऊल ठेवते आणि तिच्या भोवती चित्रविचित्र गोष्टी घडतात तसंच तिचे डोळे, अनिता दातेचा मंत्रोच्चार करतानाचा लुक पाहून तर अंगावर काटा येतो.जारण म्हणजे काळी जादु आणि ह्याच काळया जादूशी संबंधित हा चित्रपट आहे.
भूलभुलैया 2, भूलभुलैया 3, वेलकम यांसारखे सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी जारण या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी सिनेसृष्टीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करतायत. तसंच या चित्रपटाच लेखन, दिग्दर्शन ऋषिकेश गुप्ते यांनी केलं असुन अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे.तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. तसंच या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, इंदिरा तेंडोलकर