जसप्रीत बूमहाराहच करियर धोक्यात येईल ; दिग्गज गोलंदाजाने दिला इंडियाला इशारा

15
Jasprit Bumrah's career will be in danger, Shane Bond warns India
जसप्रीत बूमहाराहच करियर धोक्यात येईल शेन बॉन्डनं दिला इंडियाला इशारा

Shane Bond big Statement on Jasprit Bumrah: जसप्रीत बूमहराह जगातील सर्वात वेगवान बॉलर म्हणून समजला जातो. आज पर्यंत जसप्रीत बूमहराने भारतासाठी जीव तोडून बॉलिंग केली असून त्याच्या जोरावर टीम इंडियाने अनेक अटीतटेचे सामने जिंकले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताची ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पार पडली. या ट्रॉफीच्या शेवटच्या टेस्ट मध्ये बूमराह बोलिंग करू शकला नव्हता. त्यामुळे टीम इंडियाच मिशन देखील पूर्ण होऊ शकल नाही.

त्यानंतर आताच दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा हंगाम झाला. यातसुद्धा दुखापतीमुळे बूमराह खेळू शकला नव्हता. पण भारत आणि इंग्लंड यांच्यात टेस्ट सिरिज होणार आहे. यासाठी बूमराहच खेळण महत्त्वपूर्ण असणार आहे. सध्या जसप्रीत बूमराह आयपीयल २०२५ ची तयारी करत आहे. आगामी आयपीयल तो मुंबई इंडियन्स कडून खेळणार आहे.यामध्येच आता न्यूझीलंडचा दिग्गज बॉलर शेन बॉन्डनं बुमराहबाबत (Shane Bond big Statement on Jasprit Bumrah) एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. बुमराहच्या पाठीची जिथं सर्जरी झाली होती तिथं पुन्हा त्याला दुखापत झाली तर त्याचं करिअर समाप्त होऊ शकतं, असं त्यानं सांगितलं.

तो पुढे म्हणाला की, बूमराह ठीक राहील पण, ते त्याच्या वर्कलोडवर अवलंबून आहे. त्यामुळे मॅनेजमेंटने काळजीपूर्वक नियोजन कराव. आगामी सीरिजचा विचार करता बूमराहला आराम मिळायला हवा. असे त्यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा