मुंबई, ७ ऑगस्ट २०२३ : काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात भेट झाली. आता ते आणि त्यांच्या बरोबर आणखी काही नेते हे लवकरच भाजप बरोबर सत्तेत जातील अशा वावड्या सध्या उठत आहेत. त्यावरून जयंत पाटील यांनी कालच याबाबत स्पष्टीकरण दिले असून आपण शरद पवार यांच्याबरोबरच राहणार असल्याचे म्हटले आहे.
जयंत पाटील आता भाजप बरोबर जाणार यावरून आता उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील हे शनिवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित होते. ते पूर्णवेळ उपस्थित होते. यानंतर त्यांनी एनडीए आघाडीच्या बैठकी संदर्भात पक्षाच्या बैठकाही घेतल्या आहेत.असे राऊत यांनी म्हंटले आहे.
जयंत पाटील आणि आमचे डीएनए एकसारखे असून आम्ही पळपूटे आणि डरपोक नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांनी ही प्रतिक्रिया आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी, आपला नेता, पक्ष हा संकटात असताना, डरपोक आणि पळपूट्यासारखे जयंत पाटील पळून जाणाऱ्यातील नाहीत असे म्हटले आहे. जयंत पाटील यांनी आधीच स्पष्ट सांगितले आहे की अमित शाह यांना ते भेटलेले नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर