जम्मू -काश्मीरच्या पूंछमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जेसीओ शहीद, दोन जवान जखमी

जम्मू-काश्मीर, 15 ऑक्टोंबर 2021: जम्मू -काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली.  जिल्ह्यातील बिंबर गली येथे सुरू असलेल्या चकमकीत एक जेसीओ शहीद झाले, तर दोन जवान जखमी झाले.  लष्कराच्या सूत्रांनी जेसीओच्या हौतात्म्याची पुष्टी केली आहे.  संध्याकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे.  यासोबतच राजौरी-पूंछवरही गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आलीय
 केंद्रशासित प्रदेशात गेल्या दिवसांमध्ये दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यानंतर लष्कर दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे.  अलीकडंच पुंछ जिल्ह्यात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाई केली, ज्यात पाच जवान शहीद झाले.  दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चामेर जंगलात पोहोचले होते.  इनपुट मिळताच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरू झाली.
 या चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद झाले.  या जवानांवर संपूर्ण आदरानं अंत्यसंस्कार करण्यात आले.  हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये नायब सुभेदार (जेसीओ) जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग, शिपाई गज्जन सिंग, सराज सिंह आणि वैशाख एच यांचा समावेश आहे.
 दहशतवाद्यांचा बदला घेत अवघ्या 24 तासांच्या आत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला.  यातील काही दहशतवादी नागरिकांना लक्ष्य करण्यात सहभागी होते.  अनंतनागमध्ये लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केलं, तर बांदीपोरा येथेही एका दहशतवाद्याला ठार केलं.  त्याचवेळी शोपियानमध्ये एकूण चार दहशतवादी मारले गेले.
 दुसरीकडं, केंद्रशासित प्रदेशात दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोभाल यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली.  यामध्ये डोवाल यांनी पीएम मोदींना काश्मीर प्रश्नाची माहिती दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा