२३ ते २६ फेब्रुवारी रोजी होणार जेईई मेन्सची परीक्षा

नवी दिल्ली, १७ डिसेंबर २०२०: आयआयटी-जेईई मेन्स २०२१ परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी बुधवारी याची घोषणा केली. ते म्हणाले की, जेईई मेन्सची परीक्षा ४ सत्रात घेण्यात येणार आहे. पहिलं सत्र २३ ते २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत असंल. त्याचबरोबर इतर तीन सत्रे मार्च, एप्रिल आणि मेमध्ये भरली जातील.

जेईई मेन २०२१ अधिसूचना, परीक्षेची तारीखः

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी संयुक्त प्रवेश परीक्षेची (जेईई मेन २०२१) अधिसूचना जारी केली. त्यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली की, जेईई मेन २०२१ ची परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान असंल. ते म्हणाले की, आता या परीक्षा चार सत्रांमध्ये आणि १३ ​​भाषांमध्ये घेण्यात येतील, त्याखेरीज १५ गुणांच्या पर्यायी प्रश्नामध्ये उणे गुण मिळणार नाहीत. ही सारी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सायंकाळी ६ वाजता सामायिक केली.

ते म्हणाले की, या परीक्षा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात ४ वेळा घेण्यात येतील. उमेदवार त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी सामील होऊ शकतील.

मंगळवारी एनटीए’नं अधिकृत वेबसाइटवर एक अधिसूचना प्रसिद्ध केली, जी थोड्या वेळानं काढून टाकली गेली. एनटीए’चं म्हणणं आहे की, अधिसूचना चाचणीच्या उद्देशानं अपलोड केली गेली होती, म्हणून ती काढली गेली. शिक्षणमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार जेईई मेन २०२१ परीक्षा २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान घेण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा