वॉशिंग्टन, ५ जुलै २०२१: ॲमेझॉन ला एक बुक सेलर दुकानापासून ते जगातील सर्वात मोठी ई- कॉमर्स कंपनी बनवणारे जेफ बेजोस आपल्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा म्हणजेच सीईओ पदाचा आज राजीनामा देणार आहेत. आज जेफ बेझोस यांनी राजीनामा दिल्यानंतर अँडी जेसी ॲमेझॉनचे नवीन सीईओ होतील. मुख्य कार्यकारी अधिकारीपद सोडल्यानंतर ते ॲमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष राहतील. जेफ बेझोस आपली नवीन कारकीर्द सुरू करणार आहेत. बेजोस आता त्यांच्या इतर प्रकल्पांमध्ये अधिक वेळ घालवतील. ज्यामध्ये त्यांची अंतराळ संशोधन कंपनी ब्लू ओरिजिन मुख्य आहे. यासह, ते त्यांच्या परोपकारी उद्दीष्टांवर आणि इतर प्रयत्नांवर अधिक लक्ष केंद्रित करतील.
“बेजोस पुस्तक विक्री, रिटेल, क्लाउड कम्प्यूटिंग आणि होम डिलिव्हरी या क्षेत्रातील बदल घडवणाऱ्या पैकी एक प्रमुख होते,” असे ब्रॅकिंग्ज इन्स्टिट्युशनच्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन मधील वरिष्ठ सहकारी डॅरेल वेस्ट म्हणाले. ते म्हणाले, “ते असे अग्रणी आहे ज्यांना लोकांच्या गरजा चांगल्या प्रकारे माहीत आहेत. जसे की, एखाद्या ऑनलाइन स्टोअरला भेट देणे, एखादी वस्तू ऑर्डर करणे आणि दुसर्याच दिवशी तुम्हाला सामान तुमच्या दारात मिळेल. बेझोसने यात महत्वाची भूमिका बजावली आहे. “
जेव्हा बेझोस लोकांना भेटतात तेव्हा त्यांना त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवतात. त्यांनी गॅरेजपासून आपली कंपनी सुरू केली. या काळात त्यांनी स्वतः आलेल्या ऑर्डर्स ची पॅकिंग केली आणि डिलेवरी साठी ते पोस्ट ऑफिस मध्ये स्वतः जाऊन देत. आज, ॲमेझॉनचे बाजार मूल्य १.७ ट्रिलियन डॉलर आहे. २०२० मध्ये ई-कॉमर्स, क्लाऊड कम्प्यूटिंग, किराणा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्ट्रीमिंग मीडिया आणि बऱ्याच काही कामकाजातून त्यांना वार्षिक उत्पन्न ३८६ अब्ज डॉलर्स मिळाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे