जेजुरी : जेजुरी गडावर चंपासष्टी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. हा उत्सव जेजुरीत दिवाळी सण साजरा केला जातो. भांडाऱ्याची उधळण आणि जय मल्हारचा जयघोषच्या गजरात साजरा केला जातो.
काय आहे चंपाषष्ठी उत्सव: पुराणातील कथेनुसार ‘मणी आणि मल्य’ या अतिक्रूर प्रवृत्तीच्या दानवांशी सलग सहा दिवस शिवशंकराने मार्तंडभैरव आवारात घेऊन तुंबळ युद्ध करून या दोन्ही दानवांचा आपल्या ’ शस्त्राने त्यांचा वध केला. हाच तो ‘चंपाषष्ठी’चा विजयी दिवस.
या दुष्टराक्षसांचा सर्वनाश करून या दैत्याद्वारे त्रस्त झालेल्या महंतदेव, संत, साधु व जनांची सुटका झाली आणि आपल्या आध्यात्मिक,धार्मिक, सामाजिक संस्कृतीचे रक्षणही झाले. त्याक्षणी या विजयोत्सवानिमित्त देवदेवता, साधु-संत भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्याची फुलं, हळदीचा वर्षाव केला गेला.
त्या विजय दिवसाचं प्रतीक म्हणून‘येळकोट’ नामाच्या गर्जनेत कित्येक शतकांपासून चंपाषष्ठीच्या दिवशीच्या या उत्सवात ही प्रथा पाळली जाते.













































