जेजुरी येथील लोकवस्तीतून जाणाऱ्या ओढ्यात पाईप टाकण्याची मागणी

पुरंदर, दि. ३ जून २०२०: जेजुरी मधील विद्यानगर परिसरातील (वॉर्ड नं. ५) लोकवस्तीतून जाणाऱ्या ओढ्यामध्ये पाईप टाकून लोकवस्तीत होणारी प्रदूषण दुर्गंधी थांबवण्याची मागणी जेजुरी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी जेजुरी नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.

जेजुरी नगरपरिषदेच्या हद्दीतील विद्यानगर परिसरामध्ये लोकवस्ती मधून एक ओढा जात आहे. त्यामधून  खूप मोठ्या प्रमाणात दूषित पाणी वाहते. त्यामुळे या परिसरातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. पुढील काळात पावसाळा सुरू होत असून पावसाळ्यात डासांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याचा परिणाम म्हणून मलेरिया, डेंगू सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणावर आहे . अशावेळी  आणखी एका रोगाला आमंत्रण देणे योग्य होणार नाही. त्यामुळे तात्काळ ओढ्या मधील पाणी बंद पाईपलाईनद्वारे काढून द्यावे. अन्यथा परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा पुरंदर तालुका भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष गणेश भोसले यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी सीईओ पूनम शिंदे यांना निवेदन दिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा