गोव्याच्या समुद्र किनार्‍यावर जेलीफिश ची दहशत, ९० जणांना इजा

7

पणजी, २१ नोव्हेंबर २०२०: गोवा आपल्या समुद्रकिनाऱ्या साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळंच येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. विशेष करून परदेशी पर्यटक देखील येथे मोठ्या प्रमाणावर येत असतात. खासकरून डिसेंबरच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर प्रवासी येथे येत असतात. पण, आता येथे मौजमजा करणं महागात पडणार आहे. गोव्याच्या समुद्रावर विषारी जेलीफिशची दहशत वाढली आहे. गेल्या काही दिवसांत ९० जणांवर जेलीफिशनं हल्ला केलाय. जेलीफिशच्या संपर्कात येणार्‍या लोकांना उपचारांची आवश्यकता आहे. या विषारी माश्यांची छायाचित्रे सोशल मीडियावरही व्हायरल होतायत.

खरं तर, गेल्या दोन दिवसात गोव्याच्या बागा-कलंगुट किनाऱ्यावर जेली फिशच्या ५५ हून अधिक घटना घडल्या आहेत, तर कँडोलिम बीचवर या विषारी माशानं १० जणांना आपला डंख मारलाय. त्याच वेळी दक्षिण गोव्यात २५ हून अधिक व्यक्तींना याचा त्रास सहन करावा लागला, या विषारी माशाच्या डंखामुळं यातील बऱ्याच जणांना प्राथमिक उपचाराची गरज पडली.

जेलीफिशच्या संपर्कात येताच शरीरामध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. तसंच याचा परिणाम अवयवांपर्यंत गेल्यास अवयव देखील सुन्न पडतात. या व्यतिरिक्त बर्‍याच प्रकरणांमध्ये त्यांच्या स्पर्शामुळं बहिरेपणाची नोंद देखील झाली आहे.

‘हिंदुस्तान टाईम्स’ च्या वृत्तानुसार, बागा बीचवरील घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर रुग्णवाहिका बोलविण्यात आली. ऑक्सिजन लावल्यानंतर येथील एका व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आलं, तर एका व्यक्तीस छातीत दुखणं तसंच श्वास घेण्यास देखील त्रास होत होता.

जेली फिशचे दोन प्रकार आहेत. सामान्य आणि विषारी. बहुतेक जेली फिशमुळं लोकांना कोणतेही नुकसान पोहोचत नाही त्यांच्या संपर्कामुळं थोडीशी आग होऊ शकते, परंतु अगदी क्वचित प्रसंगी जेली फिशमुळं लोकांना मोठे नुकसान होते.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा