“आता राहीलो मी जरासा” जेष्ठ संगीतकार रवी दाते कालवश

मुंबई, ८ जुलै २०२० : जेष्ठ संगीतकार आणि दिवंगत गायक अरुण दाते यांचे कनिष्ठ बंधू रवी दाते यांनी वयाच्या ८० व्या वर्षी आखरेचा श्वास घेतला.ते मधुमेहाने त्रस्त होते व उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगी, मुलगी, सून, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. दाते यांचा नुकताच “आगाज” या गझलचा अल्बम प्रसिद्ध झाला होता.त्यांनी मराठी हिंदी गझल संगीतात उल्लेखनीय कार्य केले आहे.

त्यांनी गझलकार सुरेश भट यांच्या गझलाना संगीतबद्ध करुन त्याचा अल्बम प्रसिद्ध केला होता. तसेच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी या गझलांचे गायन केले आहे. सुरवातीला दाते यांनी तबला वादनापासून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. पं ह्रदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, अरुण दाते यांच्या बरोबर त्यांनी शेकडो कार्यक्रम सादर केले. त्यानंतर त्यांनी स्वत:ची संगीतकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली.

आता राहीलो मी जरासा, आता जगायचे असे माझे, आत्ताच अमृताची बरसून, पहाटे पहाटे मला जाग, मला गाव जेव्हा दिसू लागले ही त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे या वयातही ते कार्यरत होते. गायिका सावनी रवींद्र, प्रिंयका बर्वे या तरुण गायकांसह अनेक गायकांनी दाते यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा