जालना, दि.१४ जून २०२० : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कडेगाव येथील लहुकी नदीला ५ वर्षापासून पाणी नव्हते. पण शनिवारी ( दि.१३)रोजी झालेल्या मुसळधार पावसाने लहूकी नदी खळखळुन वाहू लागली आहे.
नदीला आलेला पूर पाहून नागरिक खुश झाले आहेत. असे पाणी २०१५-१६ पासून- वरुडी- कडेगाव देवगाव -कस्तुरवाडी -कुसळी – रोशनगाव-मांजरगाव-सायगाव पर्यंत वाहणाऱ्या लहुकी नदीला पाण्याचा थेंबही आला नव्हता.
पाच वर्षांत मृत अवस्थेत असलेल्या लहुकी नदीत खळखळून पाणी वाहिल्यामुळे परिसरातील नदी काठीचे शेतकरी तसेच बागायतदार शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु गत काही वर्षात त्यांच्या कडील सीताफळ आंबा मोसंबी द्राक्ष डाळिंब आदी फळबागा त्यांनी पाण्याअभावी नष्ट केल्या आहेत.
या नदीवरील सिंचनाचिया व्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर खूप मोठं संकट या पाच वर्षांमध्ये आले होते. परंतु शनिवारी आलेल्या पाण्यामुळे या नदीकाठी असलेले खेडे आणि त्या परिसरातील शेतकरी खूप आनंद व्यक्त करताना दिसून आले. पाच वर्षात नदीला पाणी बघायला न मिळाल्यामुळे गावकऱ्यांची खूप गर्दी केली.
न्युज अनकट प्रतिनिधी: