नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या निवडणुकीनंतर झारखंड राज्याचे विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहे.
या राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसरा टप्पा , १२ डिसेंबर रोजी तिसरा टप्पा, १६ डिसेंबर रोजी चौथ्या आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज ( दि.१) रोजी ही माहिती दिली.
दरम्यान, झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.