झारखंड राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “बड्डे अब्बू”ची बाजी

मुंबई : झारखंड येथे झालेल्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात “बड्डे अब्बू” या कोकणी सिनेमाने चार महत्वाच्या पुरस्कारावर बाजी मारली आहे. गोव्यातील ट्रक चालक आणि त्याच्या कुटुंबाची कथा या कोकणी चित्रपटात मांडण्यात आली आहे.
या चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारा हा एकमेव कोकणी चित्रपट आहे.
जमशेदपूर येथे झालेला महोत्सव व पारितोषित वितरण समारंभ लेखक- दिगदर्शक इम्तियाज अली यांच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संकलन, असे चार मोठे पुरस्कार ” बड्डे अब्बू” या चित्रपटाने पटकावले आहेत. नितीन सुपेकर यांनी या चित्रपटाने दिगदर्शन केले असून, राजेश शर्मा यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा