झोपमोड केली म्हणून एकाची हत्या

मध्य प्रदेश : झोपमोड का केली म्हणून एका सुरक्षा रक्षकाने एका इसमावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेश घडली आहे. या गोळीबारात कबीर तोमर याचा जागीच मृत्यू झाला आहे. आरोपीचे नाव अक्कू शर्मा आहे. त्याला पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्कू शर्मा हा एका खासगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तो रात्रपाळी करून आल्यानंतर घरी झोपला होता. त्यावेळी कबीर तोमर (वय २५) हा रस्त्यावर जोरजोरात आपल्या पुतण्यावर ओरडत होता. त्यामुळे झोपमोड झालेल्या शर्माने रागाच्या भरात आपली बंदूक उचलली आणि कबीरवर गोळीबार केला.
परंतु शर्मा याने झाडलेली पहिली गोळी कबीरला न लागल्याने तो त्याच्या जवळ गेला आणि पुन्हा गोळी झाडली. मात्र ही गोळी कबीरच्या वर्मी लागली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाला होता.
परंतु पोलिसांनी सापळा लावून आरोपी अक्कू शर्माला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो म्हणाला की, मी रात्रपाळी करून घरी आलो होतो. कबीर याच्या आरडाओरड मुळे वारंवार माझी झोपमोड झाली होती. यामुळे रागाच्या भरात मी त्याच्यावर गोळीबार केला.’

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा