जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : अमित देशमुख

4

औरंगाबाद, दि.७ जून २०२०: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, आरोग्य, पोलीस विभाग उत्तम कार्य करीत असून शासन कोरोना योध्यांच्या पाठिशी आहे. औरंगाबाद जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांमध्ये गती आणण्याकरता घाटी व मिनी घाटीला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा-सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी देशमुख यांनी संबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णालयांमध्ये देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, वैद्यकीय साधन सामुग्रीची उपलब्धता व आवश्यकता आणि आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली.

देशमुख म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात तोंडाला मास्क लावणे बंधनकारक करावे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष करु नये, याची दक्षता घ्यावी. तसेच या काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा