जिल्हा परिषदेचे शिक्षक जाणार इस्रोला

मुंबई : बालवैज्ञानिक घडविण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची परीक्षा घेऊन निवडलेल्या मुलांना इस्रोची सहल घडवली जाते. परंतु सहलीला नेताना शिक्षकांना मात्र वंचित ठेवले जाते. यावर्षी इस्रोला भेट देताना मुलांबरोबर शाळेतील काही शिक्षकांना स्थान मिळणार आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी या मागणीला मान्यता दिली. शिक्षक समितीचे नेते डॉ. संजय कळमकर, राज्य उपाध्यक्ष रा.या.औटी, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, सिताराम सावंत यांनी केली होती.
तसेच विम्याचे हप्ते त्यांच्या वेतनातूनच कापले जावेत, अशी मागणी समितीने केली. यावर उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या कपातीला सहमती दर्शवली. उपाध्यक्ष प्रताप शेळके यांचा शिक्षक समितीच्या वतीने सत्कार करून त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात गजानन जाधव, गणपत देठे, अंबादास मंडलिक, संजय कडूस, माणीक जगताप, संभाजी औटी, मधूकर मैड, संजय रेपाळ, गणेश कुलांगे, प्रमोद झावरे, भाऊसाहेब साठे, सतीश डोंगरे शिक्षक उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा