जिल्हाशिक्षक सुधाकर सोनवणे यांचे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत यश

नीरा : येथील प्राथमिक शाळेतीर शिक्षक सुधाकर सुरेश सोनवणे यांनी रविवार (दि.१९) या दिवशी मुंबई या ठिकाणी झालेल्या टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत ४२ किलोमीटर अंतर अवघ्या ३ तास ५९ मिनिटांमध्ये पूर्ण केले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा आशिया खंडातील सर्वात मोठी स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये ४२ किलोमीटर अंतर पूर्ण करण्यासाठी ७ तास ही निर्धारित वेळ केली आहे. परंतु सुधाकर सोनवणे यांनी ४२ किलोमीटर अंतर ३ तास ५९ मिनिटात म्हणजे निर्धारित वेळेच्या तब्बल ३ तास आधी पूर्ण केले.
सुधाकर सोनवणे यांनी या आधी पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, सातारा हिल मॅरेथॉन, बजाज अलायांज पुणे मॅरेथॉन, ए एफ एम सी पुणे मॅरेथॉन, कोनेक्रेन्स जेजुरी मॅरेथॉन, शरद मॅरेथॉन बारामती अशा अनेक ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सुधाकर सोनवणे हे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षक असून विद्यार्थ्यांमधून अनेक चांगले खेळाडू निर्माण करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा