Jio चा फक्त 1 रुपयात 30 दिवसांचा व्हॅलिडीटी पॅक, तुम्हाला मिळेल इतका डेटा

6

पुणे, 16 डिसेंबर 2021: रिलायन्स जिओने अलीकडेच आपले प्रीपेड प्लॅन महाग केले आहेत. आता ते नवीन योजना सुरू करत आहे. रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी 119 रुपयांचा प्लान लॉन्च केला होता. आता त्यांनी रु. 1 चा पॅक लॉन्च केला आहे.

हा प्लॅन जिओच्या मोबाईल अॅपवर दिसतो पण सध्या हा पॅक वेबसाइटवर लिस्ट केलेला नाही. हा पॅक तुम्ही व्हॅल्यू विभागात पाहू शकता. हा पॅक व्हॅल्यू सेक्शन मधील ओदर प्लॅन्स विभागात लिस्ट आहे.

Other Plans मध्ये, तुम्हाला Reliance Jio चा नवीन Rs 1 प्लॅन दिसेल. 1 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 100MB डेटा येतो. या प्लानची वैधता 30 दिवसांची आहे. दहा वेळा रिचार्ज केल्यावर तुम्हाला सुमारे 1GB डेटा मिळेल.

म्हणजेच, तुम्ही फक्त 10 रुपयांमध्ये 30 दिवसांसाठी 1GB डेटाचा लाभ घेऊ शकता. कंपनीच्या 15 रुपयांच्या 1GB 4G डेटा व्हाउचरसह हे परवडणारे आहे. टॅरिफ वाढल्यानंतर, Jio 15 रुपयांमध्ये 1GB डेटा ऑफर करत आहे. 100MB डेटा संपल्यानंतर, स्पीड 64Kbps पर्यंत खाली येईल.

Jio चा Rs 1 प्रीपेड प्लॅन सध्या देशातील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे. कमी-उत्पन्न वर्गातील लोकांसाठी ही एक उत्तम योजना आहे जे आवश्यकतेनुसार जास्त डेटा खरेदी करू शकत नाहीत. ग्राहकांना 30 दिवसांसाठी 100MB डेटा दिला जातो.

अशा परिस्थितीत, एखाद्याला 400MB डेटाची आवश्यकता असल्यास, ते या प्लॅनद्वारे चार वेळा रिचार्ज करू शकतात. यामुळे त्यांना जास्त डेटा असलेला पॅक घेण्याची गरज भासणार नाही. इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी सध्या आपल्या ग्राहकांना इतका स्वस्त पॅक देत नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा