जितेंद्र आव्हाड आणि संभाजी ब्रिगेड यांचा तान्हाजी चित्रपटावर आक्षेप

56

पुणे: मंगळवारी चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाच्या वेळेस पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना निर्माता आणि प्रमुख अभिनेता असणाऱ्या अजय देवगणने “या चित्रपटामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घेतली आहे,” असं आधीच स्पष्ट केलं होतं. “चित्रपटातील सर्व संदर्भ ऐतिहासिक असून यावर आम्ही बराच अभ्यास केला आहे. कोणाच्याही भावना दुखवाल्या जाणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे,” असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजय म्हणाला होता.
आव्हाड यांनी ओम राऊत यांना उद्देशून एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाच्या कथेमध्ये अनेक चुकीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाचा आरोप केला आहे. “ओम राऊत तुमच्या तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. त्यामध्ये काही प्रसंगात तुम्ही ज्या इतिहासाशी सलग्न नसणाऱ्या आणि चुकीच्या गोष्टी घुसडल्या आहेत त्यामध्ये लवकरात लवकर बदल करा अन्यथा यामध्ये मला माझ्या पद्धतीने लक्ष घालावे लागेल,” असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकचं नाही तर “याला धमकी समजली तरी चालेल,” असंही आव्हाड या ट्विटमध्ये म्हणाले आहेत. तीन मिनिट एकवीस सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये सर्व प्रमुख पात्र दिसून येतात. मात्र या ट्रेलरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत.
छञपती शिवाजी महाराजांना हाताखालील लाकूड फेकून मारणारा व्यक्ती कोण आहे, अभिनेञी काजोलच्या तोंडी असलेले संवाद आणि महाराजांच्या स्वराज्याच्या भगव्या झेंड्यावर दाखवण्यात आलेल्या ॐ ला ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. या सर्व गोष्टींबाबत निर्माता अजय देवगन व दिग्दर्शक ओम राउत यांनी खुलासा करावा अशी मागणीही संभाजी ब्रिगेडने केली आहे.