पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच जीतो कनेक्ट २०२२ चे उद्धाटन केले. नुकत्याच युरोप दौ-यावरुन परत आल्यानंतर मोदींच्या हस्ते जीतो कनेक्ट २०२२ परिषदेचा शुभारंभ हे नक्कीच लक्षणीय आहे. इतर देशांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन अतिशय भरवसा देणारा आहे, हे मोदींनी यावेळी स्पष्ट केले. पण या सगळ्यासाठी जीतो कनेक्ट २०२२ नक्की काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे… देशांतल्या सर्व व्यापारांना आपल्या मालासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करुन देण्यासाठी जीतो कनेक्ट परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हा त्याचा मुख्य हेतू आहे.
केवळ भारतीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्वदेशीचा डंका वाजावा , आणि त्या उत्पादनांना परदेशी बाजारपेठा मिळाव्यात हा जीतो कनेक्टचा मुख्य उद्देश… यावेळी पुण्यात नितीन गडकरी यांनी या परिषदेला संबोंधित केले. जगात दहशतवाद पसरतो आहे. जिथे एकमेकांना संपवण्याची भाषा बोलली जाते, तिथे जैन धर्मांच्या पंचशील तत्त्वांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी नमूद केले.
देशात निर्यात होणाऱ्या मालाचे प्रमाण वाढल्यानंतर उद्योगांना गती मिळेल आणि गुंतवणूक वाढेल. त्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि देशातली गरीबी दूर होईल. हा जीतो कनेक्टचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे भारत सुपर इकॅानॅामी झोनमध्ये येईल. हेच जीतो कनेक्ट २०२२ चे उद्दिष्ट आहे. भारताला स्वावलंबी आणि स्वकर्तुत्ववान बनवण्यासाठी जीतो कनेक्ट२०२२ चा मोलाचा वाटा ठरणार आहे.
आत्मनिर्भर भारत हा केंद्र सरकारचा नसून १३० कोटी बांधवांचा संकल्प आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्याचा शिवधनुष्य व्यापारांनी पेलावे, असे आवाहन यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केले.
स्वावलंबन, स्वकर्तृत्व आणि सक्षम या तीन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर देश नक्कीच सुपर इकॅानॅामी क्षेत्रात येईल हे नक्की.
न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस