नवी दिल्ली(प्रतिनिधी): जवाहरलाल नेहरु विद्यापीठात काही गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर बाॅलिवडूमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने जेएनयूमध्ये हजेरी लावली होती.त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या या भेटीने अनेक गोष्टी बोलल्या गेल्या होत्या. त्यावर जेएनयू भेटीवर दीपिकाने अखेर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी दीपिकाने सांगितले की, जेएनयूत जे काही घडलं त्याची मला प्रचंड चिड आली होती. सर्वांत वाईट म्हणजे हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दीपिकाने विद्यार्थ्यांना समर्थन दिल्याने एकीकडे तिच्यावर टीका होत आहे तर दुसरीकडे तिचे कौतुक होत आहे.
अशा प्रकारच्या घटना देशात नित्याच्या होऊ नये इतकंच मला वाटतं. कोणीही उठतं काहीही बोलतं, काहीही करतं.
याची मला भीती वाटू लागली आहे. हा आपल्या देशाचा पाया नाही. त्यामुळेच मी जेएनयूला भेट दिली असं ती म्हणाली आहे.
दीपिका पादुकोण हिची मुख्य भूमिका असलेला छपाक हा सिनेमा दोन दिवसांनी प्रदर्शित होत आहे. या जेएनयू भेटीच्या पार्श्वभूमीवर #boycottchhapaak हा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला आहे. तर दुसरीकडे दीपिकाच्या समर्थनार्थ #ChhapakDekhoTapaakse आणि #ISupportDeepika हा ट्रेंड सुरु झाला आहे.