जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकची जपानच्या सुमाे रेसलरसाेबत फाइट

टोकियो :जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविक आता जपान ओपन टेनिस स्पर्धेत सहभागी हाेत आहे. यासाठी ताे जपानमध्ये दाखल झाला आहे. १६ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन याेकाेविकने साेमवारी टाेकियाेमध्ये पारंपरिक डाेहयाेमध्ये (सुमाे रिंग) रेसलरच्या सरावादरम्यान हजेरी लावली. यादरम्यान त्याने सर्वच रेसलरची खास भेट घेतली. तसेच त्याने यातील काही जणांसाेबत फाइटही केली. मात्र, यादरम्यान त्याला एकाही सुमाेला जागेवरून हलवताही आले नाही. एकूणच येथील हा आनंद त्यांच्यासाठी अधिक अविस्मरणीय ठरला.

जपान ओपनच्या पुरुष गटामध्ये याेकाेविक हा आपले नशीब आजमावणार आहे. त्याचा सलामी सामना ऑस्ट्रेलियाच्या एलेक्सी पाॅपिरिनशी हाेणार आहे. हे दाेन्ही टेनिसपटू आज मंगळवारी सलमी सामन्यासाठी काेर्टवर समाेरासमाेर असतील. दरम्यान, दुहेरीच्या गटात याेकाेविकचा पराभव झाला. त्याला प्री-क्वार्टर फायनलमध्ये फिलिपसाेबत पराभवाला सामाेरे जावे लागले. ब्रुनाे आणि क्राेएशियाच्या माते पेविचने लढतीत याेकाेविक-फिलिपचा पराभव केला. त्यांनी ६-२, ४-६, १०-४ ने सामना जिंकला.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा