राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे मूळ गाव जोधपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आल्याने सध्या कोटा रुग्णालयात मुलांच्या मृत्यूचे प्रकरण थांबलेले नाही. डिसेंबर महिन्यात येथे १४६ मुलांचा मृत्यू झाला आहे.
जोधपूर येथील मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ एस एस राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार जोधपूरच्या डॉ. एसएन मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागात दररोज सरासरी ५ मृत्यूची नोंद केली जात आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत येथे १४६ मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ९८ नवजात आहेत.
ते म्हणतात की सन २०१९ मध्ये एनआयसीयू पीआयसीयूमध्ये एकूण ७५४ मुले मरण पावली, म्हणजेच दरमहा ६२ मरण पावले, परंतु डिसेंबरमध्ये अचानक हा आकडा १४६ वर पोहोचला. सर्व मृत्यू एसएन मेडिकल कॉलेजशी संबंधित मुलांचे रुग्णालय उम्मेद रुग्णालयात झाले आहेत.
अहमद पटेल यांनी सोनिया यांची भेट घेतली
राजस्थानच्या कोटा येथे असलेल्या रुग्णालयात १०० हून अधिक मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी शनिवारी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या घटने विषयी आणि महाराष्ट्रातील खाते वाटप यावर त्यांनी चर्चा केली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. पक्षातील सूत्रांनी सांगितले की, दोन्ही नेत्यांनी राजस्थानमधील मुलांच्या मृत्यूबद्दल चर्चा केली. येथे वर्षभरापासून कॉंग्रेसची सत्ता आहे.